भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:56 IST2019-01-21T00:54:50+5:302019-01-21T00:56:54+5:30
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक येथील उपसरपंचपदी चुरशीच्या लढतीत लक्ष्मण साहेबराव पाटील यांची निवड झाली.

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील
भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक येथील उपसरपंचपदी चुरशीच्या लढतीत लक्ष्मण साहेबराव पाटील यांची निवड झाली.
उपसरपंच सुचिता मनीष पाटील यांनी ठरल्यानुसार, राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. त्यासाठी सरपंच जिभू सदा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी लक्ष्मण साहेबराव पाटील व सुनंदा वाल्मीक सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. मतदान घेतले असता, दोघांना प्रत्येकी ४-४ मते मिळाली. यावेळी सरपंच जिभू पिंपळे यांनी निर्णायक मत लक्ष्मण साहेबराव पाटील याच्या पारड्यात टाकल्याने उपसंरपचपदी लक्ष्मण पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक बी.बी. पाटील व ग्रामसेवक आर.डी.चौधरी यांनी घोषित केले.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक अनंत पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.