स्वातंत्र्य दिनी न्हावी ते कल्याण बसचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:21+5:302021-08-18T04:21:21+5:30
याप्रसंगी बसचालक जी. पी. माळी व वाहक कमलेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश निंबाळे यांनी नाशिकला जाण्यासाठी ...

स्वातंत्र्य दिनी न्हावी ते कल्याण बसचा शुभारंभ
याप्रसंगी बसचालक जी. पी. माळी व वाहक कमलेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश निंबाळे यांनी नाशिकला जाण्यासाठी तिकीट काढून पहिल्या प्रवासी सीटचा मान मिळवला. ही बस दररोज सकाळी सहा वाजता न्हावी येथून सुटणार असून फैजपूर-भुसावळ-जळगाव-एरंडोल-पारोळा-धुळे-मालेगाव-मनमाड-नाशिक-शहापूर-भिवंडी अशी धावणार आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच भारती चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, म. सा. का. चेअरमन शरद महाजन, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, ग्रा. पं. सदस्य यशवंत तळेले, रवींद्र तायडे, सदस्या अलिशान तडवी, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर जयंकर यांच्यासहित सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गावातील बसफेऱ्या पूर्णतः बंद आहेत. परंतु ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने न्हावी ते कल्याण बस सुरू झाल्यामुळे लोकांनी एकच गर्दी केली होती. बस सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापक तुकाराम कोळी, विभागीय लेखाधिकारी आमिन तडवी, सहायक कार्यशाळा अधीक्षक मयूर सासे, वाहक सुपडू कोळी यांचे सहकार्य लाभले.
170821\img-20210815-wa0141.jpg
न्हावी कल्याण बस चा शुभारंभ