शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

जळगावातील समांतर रस्त्यांसाठी अखेर १०० कोटी मंजूर - एकनाथराव खडसे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:43 IST

३९ कोटी नंतर मिळणार

ठळक मुद्देकेळी उत्पादकांसाठी १०० कोटी मंजूर‘अमृत’ची शिफारस माझीच

जळगाव : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्त्याच्या कामास अंतीम मंजुरी मिळाली असून यासाठी १०० कोटी १८ लाखाचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.शहरातील त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी झालेल्या या पत्रपरिषदेस खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची उपस्थिती होती. यावेळी खडसे यांंनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे जळगावात सभेनिमित्त आले असताना आपण स्वत: हा प्रश्न सर्वप्रथम त्यांच्याकडे मांडला होता. यानंतर स्वत: मी तसेच खासदार पाटील व रक्षा खडसे अशा तिघांनी पाठपुरवा केला व चार बैठक ाही आतापर्यंत गडकरी यांच्यासोबत झाल्या.मनपाच्या अंतर्गत असलेला समांतर रस्त्यांच्या कामासाठी काही तांत्रिक अडचणीही आल्या. शेवटी या प्रयत्नांना यश आले आहे.केळी उत्पादकांसाठी १०० कोटी मंजूरकेळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी कृषिमंत्र्याची भेट घेतल्यावर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीक विम्याचे १०० कोटी रुपये मंजूर झाले असून ही रक्कम त्यांना लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.‘अमृत’ची शिफारस माझीचजळगाव आणि भुसावळ या शहरात अमृत योजनेची शिफारस कॅबीनेटमध्ये असताना मीच केली होती, असेही खडसे यांनी सांगितले.पथदिव्यांसाठी जिल्ह्यातील ४ शहरे दत्तककेंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी आणलेल्या योजनेनुसार भुसावळ, सावदा, मुक्ताईनगर आणि बोदवड ही ४ शहरे एलइडी पथदिवे योजनेत दत्तक दिली जाणार आहे. हा करार दोन- तीन दिवसात होणार आहे. यानुसार संबंधित कंपनी बिलाच्या जबाबदारीसह लाईट बसविणे व दुरुस्ती ही कामे पाहणार आहे. एलईडीमुळे नगरपालिकेच्या बिलाची जी बचत होईल, त्यातून कंपनी आपला खर्च आणि नफा मिळवणार आहे. जळगावातही ही योजना आणण्याचा विचार असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पत्र प्राप्तराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतच्या समांतर रस्त्याच्या कामाच्या मंजुरीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (नही) पत्र २७ जुलै रोजी खडसे यांना प्राप्त झाले आहे. हे पत्रही त्यांनी पत्रपरिषदेत दाखवले. दरम्यान इतर वाढीव कामांसाठी ३९ कोटीही नंतर मिळणार असल्याची माहितीही खडसे यांनी दिली.मेहरुण तलाव सुशोभीकरणासाठी ५० लाखमेहरुण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मागे ४ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले होते. नुकतेच यापैकी ५० लाख बांधकाम विभागास प्राप्त झाले असून टेंडर प्रक्रीयेनंतर टप्प्या टप्प्याने इतर रक्कम मिळणार असल्याचे खडसे म्हणाले. मी जनतेच्या मनात आहे, त्यामुळे जाहिरातीत फोटो नसला तरी मला काहीही फरक पडत नसल्याचेही खडसे यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.टोल न आकारण्याची मागणीसमांतर रस्ते होत असल्याने जळगावकरांचा महत्वाचा एक प्रश्न सुटत असला तरी या रस्त्यावर टोलचा भार देवू नये, अशी मागणी आपण गडकरी यांच्याकडे केली असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही यावेळी खडसे म्हणाले.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव