शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

भडगाव तालुक्यातील महिंदळे ते वडजी फाटा रस्ता मोजतोय शेवटच्या घटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:53 IST

महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे

ठळक मुद्देएरंडोल ते आर्वी रस्ता सोसतोय खड्ड्यांचे घावसाईडपट्ट्या खोल व मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांना गमवावा लागला जीवयाशिवाय काही कायमचे झाले अधूशासनाची खड्डे दाखवा व एक हजार रुपये मिळवा योजना कुठे गेली?

महिंदळे, ता भडगाव, जि.जळगाव : महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशी या अत्यंत रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.महिंदळे ते वडजी फाटा या आठ कि.मी. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे दर दोन तीन दिवसांनी छोटे-मोठे अपघात होतच असतात. या रस्त्यावर वळणेही मोठ्या प्रमाणात आहेत व रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे वाहनधारक खड्डे चुकवण्याच्या नादात एकमेकांवर आढळतात किंवा खड्डे चुकवताना रस्त्यावर पडतात. या रस्त्यावर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे तर काही अंथरूणावर पडले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाची मलमपट्टीही तात्पुरत्या स्वरूपात होते. खड्डे मात्र तसेच असतात. सर्वत्र रस्ता कामाला गती दिसत आहे पण या रस्त्यावरील खड्ड्यांकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भडगाव ते मालेगाव यातील अंतर कमी करणारा हा एरंडोल ते आर्वी रस्ता नूतनीकरणापासून कोसोदूर आहे.महिंदळे ते वडजी फाटा रस्त्यावर खरोखर मोठमोठे खड्डे असल्यामुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घेण्यात येईल व या रस्त्याचे नूतनीकरण लवकरच होणार आहे. कामही मंजूर आहे, पण प्रशासकीय मान्यता मिळताच कामाला सुरुवात होईल.-वीरेंद्र राजपूत, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भडगाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhadgaon भडगाव