एरंडोल तालुक्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:50+5:302021-06-19T04:11:50+5:30

प्रमोद पाटील कासोदा, ता.एरंडोल : सुमारे दहा क्विंटल वजनाचा एक कोटी २० लाख रुपये किमतीचा गांजा ओडिशातील कोरापूत जिल्ह्यात ...

Large racket of cannabis smuggling uncovered in Erandol taluka | एरंडोल तालुक्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड

एरंडोल तालुक्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड

प्रमोद पाटील

कासोदा, ता.एरंडोल : सुमारे दहा क्विंटल वजनाचा एक कोटी २० लाख रुपये किमतीचा गांजा ओडिशातील कोरापूत जिल्ह्यात पकडण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन आरोपींचा समावेश आहे. यात एक शासननियुक्त रखवालदार म्हणजे पोलीस पाटील असल्याने, चौकीदारच चोर निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक पोलिसांनी या प्रकाराला दुजोरा दिला असला, तरी अधिकृत माहिती आल्यानंतर कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गांजा तस्करीबाबत नेहमी चर्चा होत होती, तालुक्यातील एका अत्यंत लहान खेड्यातून या व्यवसायाची सूत्रं हलतात, पण हे लोक स्थानिक पातळीवर हा व्यवसाय करीत नसल्याने, पोलिसांनाही माहिती असल्यावरही काही कारवाई करता येत नव्हती, पण आता तालुक्यातील हे आरोपी ओडिशात आढळून आल्याने आरोपींकडून अधिकची माहिती मिळेल, अनेक नावे समोर येतील अशाही चर्चा सुरू झाली आहे.

ओडिशा राज्यातील व स्थानिक भाषेतील न्यूज चॅनलला या आशयाची एक बातमी दाखविण्यात आली होती. यात ८ जून जयपुरे येथे एका ट्रकमधून दहा क्विंटल वजनाचा गांजा स्थानिक पोलिसांनी पकडला आहे, याची बाजारात एक कोटी दहा लाख रुपये किंमत सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दोन आरोपी पकडल्याची माहिती दाखविण्यात आली. या व्हिडीओत दाखविले जाणारे आरोपी या तालुक्यांतील लोकांनी ओळखले असून, त्यातला एक पोलीस पाटील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित पोलीस पाटील गेल्या ८/१० दिवसांपासून गावात नसल्याची माहिती मिळाली आहे.

या गोरख धंद्यात अफाट पैसा मिळत असल्याने, अनेक गावांतील अनेक तरुण या रॅकेटमध्ये सामील असल्याची मोठी चर्चा आता होत आहे.

कोट

पोलिसांना माहिती आम्हाला मिळाली आहे, पण अधिकृत माहिती संबंधित पोलिसांकडून लवकरच प्राप्त होईल, त्यानंतर, कारवाई करता येईल, संबंधित पोलीस पाटलांना याबाबत काही दिवसांपूर्वी बोलावून माहिती घेण्याचा प्रयत्नही केला होता, आता प्रांताधिकारी व वरिष्ठांना याबद्दल अहवाल पाठविण्यात येणार आहे.

- रवींद्र जाधव, सपोनि. पोलीस ठाणे कासोदा.

Web Title: Large racket of cannabis smuggling uncovered in Erandol taluka