ललित कला केंद्र चोपडाचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:59+5:302021-08-13T04:20:59+5:30
कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.) प्रथम वर्षात संयुक्त प्रथम क्रमांक- निखिल संजय पाटील (बलवाडी, ता. रावेर) व रोशन राजू ...

ललित कला केंद्र चोपडाचा निकाल १०० टक्के
कला शिक्षक पदविका (ए.टी.डी.) प्रथम वर्षात संयुक्त प्रथम क्रमांक- निखिल संजय पाटील (बलवाडी, ता. रावेर) व रोशन राजू बंजारा (बभळाज ता.शिरपूर), द्वितीय क्रमांक - सिद्धी सुनील गुजराथी (चोपडा), तृतीय क्रमांक- दीपाली पांडुरंग बोरसे (धनवाडी, ता.चोपडा), फाउंडेशन वर्गात प्रथम क्रमांक : कविता विजय पाटील (शिरपूर), द्वितीय : विनोद मोहन बंजारा (बभळाज, ता.शिरपूर), तृतीय : प्रसाद रतिलाल सोनवणे (घोडगाव, ता.चोपडा) आणि जी. डी. आर्ट, (रेखा व रंगकला).
डिप्लोमा वर्गात प्रथम- जसवंतसिंग डोंगरसिंग राजपूत (सांगवी, ता. शिरपूर), व्दितीय कुरेशी इरमनाझ शेख शब्बीर (चोपडा) यांनी पटकावला आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा पूनम आशिष गुजराथी, सहसचिव अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी, प्रा. आशिष सुभाषलाल गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन व संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.