लालबाग मित्र मंडळ देणार सामाजिक उपक्रमांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:49+5:302021-09-10T04:21:49+5:30
०९ सीटीआर ४१ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सागर पार्क परिसरातील स्नेह फाउंडेशन संचलित लालबाग मित्र मंडळाची कार्यकारिणी ...

लालबाग मित्र मंडळ देणार सामाजिक उपक्रमांवर भर
०९ सीटीआर ४१
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सागर पार्क परिसरातील स्नेह फाउंडेशन संचलित लालबाग मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी भावेश कोल्हे तर सचिवपदी सचिन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाचे मंडळाचे ११ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते़ यंदा सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नेरपगारे यांनी दिली. गणेशोत्सव काळात रोजगार मेळावा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, कोरोना लसीकरण मोहीम आदी उपक्रम राबविले जाणार आहे.
अशी आहे कार्यकारिणी
उपाध्यक्ष चैतन्य रंधे, सहसचिव धवल चौधरी, कार्याध्यक्ष शुभम पवार, खजिनदार सागर पाटील, सहखजिनदार नमित भोळे तर सल्लागार म्हणून विजय काबरा, इंद्रजित राणे, निखिल चौधरी, विलास पाटील, रोमी महिंद्रा, शंकरराव पोळ यांची निवड झाली आहे़ तसेच सदस्यांमध्ये मयूर भोळे, केतन अत्तरदे, रवी महाजन, प्रतीक फेगडे, संकेत कापसे, शीतल जैन, आंचल सारस्वत, मंगेश दुतोंडे, चेतन बेनल, कृणाल चौधरी, रोहित पिंपळकर, तेजस शिंदे, शिवम घोरपडे, रितेश पवार, गणेश धनगर, रुपेश चव्हाण, रजत भोळे, भूषण पाटील, शुभम रंधे, प्रेम सांगोरे, दक्ष कुलकर्णी, प्रितेश कुचेरिया, आदेश ललवाणी, मृणाल पाटील, वेदांत कुलकर्णी आदींचा समावेश आहे.