शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तरुणाला लाखोचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:54 PM

न्यायाधीशांचे बनावट जामीन आदेश

जळगाव : ट्रक चालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात काराृहात असलेल्या आरोपीचा जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपीच्या भावास चंद्रकांत गणपत सुरळकर (३६, रा.टॉवर चौक, जळगाव) याने १ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. सुरळकर हा स्वत: खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असून जामीनावर असताना त्याने हा गुन्हा केला आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा शिवारात मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद (२५, रा.प्रतापगढ, उत्तर प्रदेश) या ट्रक चालकाचा तेल चोरीसाठी दोन जणांनी आॅगस्ट महिन्यात खून केला होता. या प्रकरणात विशालसिंग अमरनाथसिंग राजपूत (रा.बिहटा, पो.पथी, ता. फुलपुर, जि.अजमगढ, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावातून अटक केली होती.जामीनाच्या आशेवर लॉजमध्ये वास्तव्यचंद्रकांत सुरळकर याने जामीनाची जबाबदारी घेतल्यानंतर सौरभसिंग याच्याकडून सुरुवातीला ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर ३० हजार रुपये घेतले. परत २५ हजार रुपये दिले. ही सर्व रक्कम तो उत्तर प्रदेशातून सुरळकर याच्या बॅँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर ६ नोव्हेंबरला तो जळगावात आला. शहरातील एका लॉजमध्ये वास्तव्य केले. रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या सुरळकर याला काही रक्कम दिली. त्यानंतर परत सॉल्वंसीसाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. पैसे परत दिले नाहीत तर तुला मारुन टाकेन, तुला गावाला परत जावू देणार नाही अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौरभसिंग याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेतली. रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, विनोद पाटील, अनिल जाधव, अनिल देशमुख, पल्लवी मोरे, विनयकुमार देसले व दर्शन ढाकणे यांच्या पथकाने सापळा रचून चद्रकांत सुरळकर याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.न्या.सानप यांच्या नावाचे बनावट आदेशपोलिसांनी चंद्रकात सुरळकर याला अटक करुन झडती घेतली असता त्याच्याकडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या नावाचे बनावट जामीन आदेश आढळून आले आहेत. या आदेशावर सानप यांचे नाव असले तरी सही व शिक्का नाही. या आदेशाच्या प्रती पोलिसांनी जप्त केल्या आहेत.कारागृहात झाली ओळखविशालसिंग गुन्हा उघडकीस आल्यापासून कारागृहात आहे. त्याच काळात चंद्रकांत सुरळकर हा देखील शहर पोलीस स्टेशनच्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तेथे विशालसिंग याच्याशी त्याची ओळख झाली. काही दिवसांनी सुरळकर याला जामीन मंजूर झाला. तेव्हा तुलाही जामीन मिळवून देतो असे सांगून त्याने विशालसिंगला सांगितले. त्यानुसार विशालसिंग याने त्याचा भाऊ सौरभसिंग याच्याशी संपर्क करुन देत पुढील व्यवहार सुरळकरशी करण्याबाबत सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव