कुसुम चौधरी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:32+5:302021-08-19T04:22:32+5:30
अट्रावल (ता. यावल) : कुसुम डिगंबर चौधरी (७६) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ...

कुसुम चौधरी यांचे निधन
अट्रावल (ता. यावल) : कुसुम डिगंबर चौधरी (७६) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सहा मुली, सून असा परिवार आहे. अतुल चौधरी यांच्या त्या आई होत.
केसरबाई झांबरे
भुसावळ : केसरबाई सोमा झांबरे (८४. रा. राम मंदिर वाॅर्ड ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पाच मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या हिरामण झांबरे यांच्या आई होत.
मिराबाई चंदन
भुसावळ : वरणगाव रोडवरील एमआयडीसी परिसरातील रहिवासी मिराबाई भगवानचंद चंदन (६९) यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त रेल्वेचालक भगवान चंदन यांच्या पत्नी होत.
द्वारकाबाई बडगुजर
पारोळा : द्वारकाबाई भगवान बडगुजर (८५, रा. व्यंकटेश नगर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्या रमेश व सुरेश बडगुजर यांच्या मातोश्री होत.