जळगावात तिसऱ्या रेल्वेलाईनसाठी १४९ वृक्षांवर चालणार कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:45 IST2017-12-05T13:39:54+5:302017-12-05T13:45:10+5:30
जळगाव ते भुसावळ दरम्यान सुरू आहे तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम

जळगावात तिसऱ्या रेल्वेलाईनसाठी १४९ वृक्षांवर चालणार कुऱ्हाड
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ - जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु आहे़ यादरम्यान अपलाईनवर मार्गात अडथळा ठरणाऱ्या १४९ विविध वृक्षांची तोड करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाची प्रकिया सध्या सुरु आहे़ तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी अपलाईनवर नशिराबाद, जळगाव खुर्द तसेच खिर्डी शिवारात मार्गात काही वृक्ष अडथळा ठरणार आहेत़ यात शिरस, निंब, बाभूळ, हिवर, भोकर या वृक्षांचा समावेश आहे़ अशा एकूण १४९ वृक्ष तोडण्यात येणार आहेत़ या वृक्ष तोडण्याचा मक्ता देण्यात येणार असून त्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील उपमुख्य अभियंता निर्माण कार्यालयातर्फे निविदा प्रसिध्द झाली आहे़