धामणगावच्या आरोग्य केंद्रात आजपासून कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST2021-03-08T04:17:06+5:302021-03-08T04:17:06+5:30

ममुराबाद : परिसरातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. या वेळी जिल्हा आरोग्य ...

Kovid vaccination from today at Dhamangaon health center | धामणगावच्या आरोग्य केंद्रात आजपासून कोविड लसीकरण

धामणगावच्या आरोग्य केंद्रात आजपासून कोविड लसीकरण

ममुराबाद : परिसरातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.

या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण उपस्थित राहणार आहे. आरोग्य केंद्रावर ६० वर्ष वयावरील नागरिक तसेच ४५ वर्ष वयावरील कोमॉरबीड (मधुमेह, उच्चरक्तदाब व इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त) नागरिकांना कोविड लसीकरणाचा लाभ विनामूल्य घेता येईल. लसीकरण आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुरू राहणार आहे. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले, डॉ. प्रतिभा बारी यांनी केले आहे.

Web Title: Kovid vaccination from today at Dhamangaon health center