कोथळी-मुक्ताईनगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवड हे वारकऱ्यांचे चार धाम : हभप रवींद्र महाराज हरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:59 IST2018-01-18T16:52:48+5:302018-01-18T16:59:35+5:30
एकनाथ भागवत पारायणाची काल्याच्या कीर्तनाने समाप्ती

कोथळी-मुक्ताईनगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवड हे वारकऱ्यांचे चार धाम : हभप रवींद्र महाराज हरणे
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.१८ : टाळ मृदंगाच्या गजरात सुमारे ५० हजार भाविकांच्या उपस्थितीत संत मुक्ताई मंदीरावर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्री एकनाथी भागवत पारायण राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे हभप रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी समाप्ती झाली. त्यांनी कोथळी आणि मुक्ताईनगर ही संतांची भूमी आहे. यातही कोथळी धाम सर्वात मोठे असल्याचे विचार व्यक्त केले.
समारोपा प्रसंगी काल्याच्या कीर्तनाला गर्दीचा उच्चांक गाठला गेला. टाळ मृदुंगाचा गजर आणि तल्लीन भाविकांच्या पाऊलांनी अवघे क्षेत्र कोथळी मंत्रमुग्ध झाले होते. सभामंडपात संत भक्तांच्या या मेळ्यात भाविक बेभान होते.
गुरुवारी सकाळी गाथा पूजन करुन सकाळी १०.३० वाजता रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याच्या कीर्तनाला सुरुवात केली. टाळ मृदुंगाच्या गजरात अतिशय भक्तीमय वातावरणात तल्लीन होत व पावल्या खेळत परीसर दुमदुमला होता. कीर्तनात त्यांनी कोथळी, मुक्ताईनगर ही भूमी संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. राज्यात कोथळी मुक्ताईनगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवड ही चार धाम असून कोथळीचे धाम हे सर्वात मोठे धाम आहे. संत भूमी आहे. मुक्ताईसह चारही भावंडांनी संपूर्ण विश्वाला एकतेचा व भक्ती, ज्ञानाचा विचार आणि मार्ग दिला. मुक्ताबाई हे एक शक्तीपीठ व अधिष्ठान असून आपण खºया अर्थाने मुक्ताईचे पाईक आहोत. काल्याचे कीर्तन हे एक साधनेचे एकक असून परीसरातील सर्वांनी तुळशीची माळ घालून मुक्ताई सेवेत यावे. एकादशी व्रत करावे व वारकरी आचार विचार अंगिकारावे असे संबोधन केले.
पारायण सोहळा यशस्वीतेसाठी आमदार एकनाथ खडसे, संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, हभप उद्धव जुनारे महाराज, निवृत्ती पाटील, विनोद सोनवणे, ललित बाविस्कर, सदाशिव पाटील, शेखर वानखेडे, चंदू पाटील, ज्ञानेश्वर हरणे, विशाल महाराज खोले यांनी परीश्रम घेतले.
दहा लाख भाविकांनी घेतला प्रक्षेपणाचा लाभ
गेल्या दहा दिवसांपासुन सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे युटुबवर लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते. चॅनलच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कानाकोपºयात मोबाईलवर दररोज दहा लाखांच्यावर भाविक प्रक्षेपण पहात होते.