शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जाणून घ्या खान्देशच्या भूमीवर कुणाची होती मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:04 PM

बहामनींना मिळविता आला नाही कधीही खान्देशचा भूभाग

ठळक मुद्देफारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालययादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्ताखान्देशचा ‘सिपाह-सालार किताब

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : खान्देशात १३४७ मध्ये बहामनी राजसत्ता स्थापन झाल्यानंतर दक्षिणेत एक प्रभावी राजवंश उदयाला आला. नंदुरबार व सुलतानपूर ‘सरकार’ वगळता खान्देशचा सर्व भाग दिल्लीच्या सुलतानांकडेच राहिला. त्यामुळे बहामनींना खान्देश मिळविता आला नाही. त्यामुळे खान्देशची खरी सूत्रे असीरगडच्या अधिपतीकडेच राहिली. या भूभागावर यादव, खजली व नंतर तुघलकांची सार्वभौम सत्ता असली तरी प्रत्यक्ष मालकी स्थानिक निकुंभ, अहीर व राजपूत अधिपतींकडे होती.फारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालयदिल्लीचा सुलतान फिरोजशहा तुघलक याने थाळनेरचा भाग १३७० मध्ये मलिक राजा याला जहागिरी दाखल दिला. मलिक राजाने तुघलकाची मर्जी केवळ एका लहानशा सेवेच्या बदल्यात मिळविली होती. दौलताबादचे सुफी संत शेख झैनुद्दीन यांनी या कामी मलिक राजाला मदत केली. या मदतीमुळे संपूर्ण फारूकी घराणे या सुफी संताचे चाहते झाले होते. जहागिरीची सनद दिल्ली येथून आणून मलिक राजाने विद्यमान धुळे जिल्ह्यातील थाळनेरला आपले मुख्यालय उभारले.

यादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्तामलिक राजाने सावकाशपणे येथील अधिपतींना संपुष्टात आणून आपली सत्ता वाढविली. पूर्वेकडील वाघळीला एक राजपूत अधिपती अधिकारूढ होते. पितळखोरा टेकड्यांचा पायथा व कसारबारी घाटालगतच्या भागावर पूर्वी यादवांचे मांडलिक असलेल्या निकुंभांची अधिसत्ता होती. पूर्वेकडील भागावर गवळी राजा आसा अहीर यांची सत्ता असावी. थाळनेरच्या उत्तरेकडील सोनगरीवर दुसºया राजपुतांची सत्ता होती. कालांतराने सर्व अधिपतींनी फारूकीचे मांडलिकत्व पत्करले.

खान्देशचा ‘सिपाह-सालार किताबथाळनेर व कुरुंदोचा ताबा घेतल्यानंतर मलिक राजाला बागलाणच्या वहीजी नामक अधिपतीशी सामना करावा लागला. मात्र या मोहिमेत मलिकला हत्ती व प्रचंड धनप्राप्ती झाली. ही लूट मलिकने राजा फिरोजशहा तुघलकाकडे पाठविली. फिरोजशहा यांनी खुश होऊन मलिकला बढती देऊन खान्देशचा ‘सिपाह-सालार’ हा किताब दिला. १३८२ मध्ये फिरोजशहा तुघलक वार्धक्याने कमकुवत झाल्याने मलिक राजाने दिल्लीस खंडणी पाठविणे बंद करीत आपले स्वातंत्र्य घोषित केले.खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून वादखान्देशच्या सुपीक प्रदेशावरून गुजरात व फारुकींचे वारंवार वाद निर्माण होत होते. ते थांबविण्यासाठी मलिक राजा फारूकीने आपल्या मुलीचे लग्न माळव्याच्या दिलावर खान यांच्या मुलीसोबत केले. तसेच आपल्या मुलाचा विवाह दिलावरच्या मुलीसोबत लावून दिला होता. या परस्पर विवाहसंबधांमुळे फारूकींचे स्थान बळकट झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव