हाणामारीतील झडतीत सापडला चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:43 IST2019-05-21T12:42:59+5:302019-05-21T12:43:29+5:30
गुन्हा दाखल

हाणामारीतील झडतीत सापडला चाकू
जळगाव : शहरातील कोर्ट चौक परिसरात संदीप मांगीलाल जैन (रा़ गुजराज पेट्रोलपंपाजवळ) हा सोमवारी रात्री जिल्हापेठ पोलिसांना चाकू बाळगताना आढळून आला असून त्याच्याविरूध्द पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संदीप हा सोमवारी रात्री ८ वाजेच्य सुमारास नवीन बसस्थानकाकडून कोर्ट चौकात आला असता त्याचा एका महिला व पुरूषाशी वाद झाला़ नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले़ हा प्रकार नागरिकांनी पोलिसांना कळविताच जिल्हापेठ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली़
कोर्ट चौकात पोलीस पोहोचताच त्यांनी वाद सोडवून संदीप याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ चाकू आढळून आला़ चाकूसह त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीस ठाणे गाठले़ रात्री उशिरा त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़