विसर्जन मिरवणुकीतील वादातून चाकू हल्ला, युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 09:42 IST2017-09-06T09:40:09+5:302017-09-06T09:42:45+5:30
भुसावळ शहरात मंगळवारी विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादातून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
_201707279.jpg)
विसर्जन मिरवणुकीतील वादातून चाकू हल्ला, युवकाचा मृत्यू
जळगाव, दि. 6 - भुसावळ शहरात मंगळवारी विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादातून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या मागे विसर्जन मिरवणुकीतील वादातून विकी हरी पाटील (19) या तरुणावर चाकूहल्ला झाला.
काल रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. विकीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांना गोलू सावकारे याच्यावर संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.