भुसावळ : शहरात विविध गुन्हेगारींच्या घटना थांबता थांबेना असे झाले आहे. यात रक्तरंजीत घटनाही कमी नाहीत. आठवडाभरातच पुन्हा चाकू हल्ल्याची घटना रविवारी घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
३ रोजीही झाला होता जीवघेणा हल्ला
शहरातील गडकरी नगर नगरपालिका रुग्णालया जवळून शुभम दिलीप खत्री (२७) (रा. शिवदत्तनगर, संत गाडगे महाराज, होस्टेलजवळ, भुसावळ) हा ३ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या दरम्यान जात असताना त्याच वेळेस आरोपी हाशीम शेख व हर्षल शिंदे ऊर्फ कॅलीस दोन्ही रा. भुसावळ यांनी पाठी मागून येऊन ठोकर दिली. व त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी शुभम खत्री यास चाकूने डाव्या बाजूला मारून दुखापत केली होती. तर काही दिवसांपूर्वी खुनाचीही घटना घडली आहे. नेहमीच खून व जीवघेणा हल्ला अशा घटना घडतच आहेत.