भुसावळ येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: April 22, 2017 17:25 IST2017-04-22T17:25:20+5:302017-04-22T17:25:20+5:30

संशयित आरोपीस अटक करण्यात आली़

A knife assault on a young man in Bhusawal | भुसावळ येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

भुसावळ येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

भुसावळ, जि. जळगाव, दि. 22 - दारू पिण्यास नकार दिल्याने शहरातील युवकावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना जळगाव रोडवर घडली़ या गुन्ह्यातील संशयित आरोपीस अटक करण्यात आली़
फिर्यादी केतन भरत चौधरी (वय 25, अयोध्यानगर, भुसावळ) हा   मित्रासोबत 21 रोजी रात्री 10़30 वाजता जळगाव रोडवर गप्पा मारत असताना संशयित आरोपी बारक्या भोई (हंबर्डीकर चाळ, भुसावळ) तेथे आला़ काहीही कारण नसताना दारू पिण्याचा आग्रह धरला. त्यावेळी केतनने नकार दिल्यानंतर त्याच्यावर चाकूने छाती, हातावर वार  करण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आह़े आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास शनिवारी अटक करण्यात आली़

Web Title: A knife assault on a young man in Bhusawal