शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Kirit Somaiyya : 'अशी दादागिरी चुकीची, तुम्ही खरे आहात तर पुढे यायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:28 IST

रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा

जळगाव - भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर, किरीट सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या सूचनेनंतर माझ्यावर हल्ला झाल्याचे ते म्हणाले. याबाबत भाजप नेत्या खासदार रक्षा खडसे यांनीही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारले आहेत. 

रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा, असा सल्लाही खडसेंनी दिला. महाराष्ट्रात अतिशय चुकीच्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला काही चुकीचं वाटत असल्यास आरटीआयच्या माध्यमातून ती व्यक्ती माहिती घेऊ शकते. पण, दादागिरी करून, एखाद्याला खाली पाडून खच्चीकरण होत असेल तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. आता, त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते असं करत असतील तर ही दादागिरीच आहे. कोणताही पक्ष ही दादागिरी खपवून घेणार नाही, असेही रक्षा खडसेंनी म्हटले.

हिंसेचं समर्थन नाही - पटोले

काँग्रेसनेही हिंसेचे समर्थन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना किरीट सोमय्यांवरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, कुठल्याही हिंसचं समर्थन करता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं.  

काय म्हणाले सोमय्या 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसैनिक अशा पद्धतीनं कटकारस्थान रचून हल्ला करतात, त्याचं वाईट वाटतं, असं किरीट सोमय्या म्हणाले. या प्रकरणी उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शनिवारी पालिका कार्यालयाला सुट्टी होती. मग शिवसैनिक आत घुसलेच कसे? त्यांना आत कोणी सोडलं?, असे प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मुख्यमंत्री ठाकरे अस्वस्थ आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल परब अडचणीत आहेत. हे दोन नेते मुख्यमंत्र्यांचा उजवा आणि डावा हात. दोघेही अडचणीत आल्यानं मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यामुळेच हल्ल्याचा कट रचला गेला आणि मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना झाल्यानंतरच हल्ला केला गेला, असा आरोप सोमय्यांनी केला. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याJalgaonजळगावBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री