शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चाळीसगाव येथील तरुणाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:43 IST

चाळीसगाव , जि.जळगाव : काहीतरी कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मार्बल व्यापाºयाच्या १९ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करीत ...

ठळक मुद्देपाच जणांविरुद्ध गुन्हाअपहरणाचे कारण अज्ञातमारहाण करीत सायंकाळी कारमधून नेले पळवूनअपहृत तरुण मार्बल व्यापाऱ्याचा पुतण्या

चाळीसगाव, जि.जळगाव : काहीतरी कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मार्बल व्यापाºयाच्या १९ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करीत कारमधून पळवून नेत अपहरण केले. हा खळबळजनक प्रकार शहरातील डेराबर्डी भागात राणीपार्क हॉटेलजवळ १८ रोजी सायंकाळी ७ .३० वाजता घडला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती अशी की, राजस्थानातील ढाणी, मु.पो.बाणोरा, ता.दातारामगड, जि. सिकर येथील रहिवासी गुलाबचंद हिरालालजी जांगीड हे गेल्या १५-२० वर्षांपासून चाळीसगाव येथे ग्रेनाईड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.धुळे रोडवरील मानराज मोटार्सजवळ त्यांचे मार्बलचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी ते मूळ गावी गेले असता त्यांचा मोठा भाऊ मदनलाल यांनी त्यांचा मुलगा गजनन मदनलाल जांगीड (वय १९) याला त्याचे मित्र विनाकारण त्रास देत असतात. त्यामुळे त्याला चाळीसगाव येथे घेऊन जा, असे सांगितले. तेव्हापासून मदनलाल यांची दोन्ही मुले ही गुलाबचंद यांच्याकडे व्यवसायात मदत करण्यासाठी चाळीसगावी असतात.१८ रोजी गजानन यास घरी काही कामासाठी पाठवले. घरून तो पुन्हा दुकानात जात असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास राणीपार्क हॉटेलसमोर रमेश जाखड, बलबीर जाखड व त्यांचे इतर दोन ते तीन मित्र यांनी गजानन यास मारहाण केली व डब्ल्यूबी-०६-०४४१ या कारमध्ये बळजबरीने टाकून त्याचे अपहरण करून धुळ्याच्या दिशेने पळवून नेले. टोळक्याने ज्या वाहनातून गजानन याचे अपहरण करून पळवून नेले ती कार दिवसभर काम करण्यासाठी मानराज मोटर्स येथे लावलेली होती. मानराज मोटार्समधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब उघड झाली असून, पाच जण ती कार घेऊन आले होते. अपहरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर गुलाबचंद जांगीड यांनी या कारचा धुळ्यापर्यत पाठलाग करून शोध घेतला पण मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पुतण्या गजानन जांगीड याला मारहाण करून त्याचे वाहनातून अपहरण केल्याप्रकरणी रमेश जाखड, बलराज जाखड यांच्यासह पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी शहर पोलिसात पाच ते सहा जणांविरोधात भा.दं.वि. कलम ३६३, ३२३, ३४ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव