जामनेरमध्ये तरुणीचे अपहरण, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:21 IST2021-08-14T04:21:11+5:302021-08-14T04:21:11+5:30

जामनेरला तरुणीचे अपहरण, गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : शहरातील एका तरुणीचे गुरुवारी ओळखीच्याच तरुणाने चारचाकी वाहनात बसवून ...

Kidnapping of a young woman in Jamner, case filed | जामनेरमध्ये तरुणीचे अपहरण, गुन्हा दाखल

जामनेरमध्ये तरुणीचे अपहरण, गुन्हा दाखल

जामनेरला तरुणीचे अपहरण, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : शहरातील एका तरुणीचे गुरुवारी ओळखीच्याच तरुणाने चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. हिवरखेडे (ता. जामनेर) गावाजवळ तिला सोडून दिल्याची घटना घडली.

तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर तिने शुक्रवारी पोलिसात तक्रार दिली. गेल्या एक वर्षापासून ओळख असल्याने सज्जू इसाक मुजावर (रा. जामनेर) याने गुरुवारी लहान मुलाच्या हातून तरुणीकडे मोबाईल पाठविला, एका हॉलजवळ भेटायला एकटी बोलाविले. तरुणी भेटायला गेली असता त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवीत जबरदस्तीने कारमध्ये बसविले व हिवरखेडे गावाजवळ सोडून दिले, असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी सज्जू मुजावर याच्याविरुद्ध भादंवि ३६३, ३६६, ३५४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक किशोर पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a young woman in Jamner, case filed