पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST2021-06-10T04:12:18+5:302021-06-10T04:12:18+5:30

संशयिताला अटक : गुन्ह्यात कलम वाढविले जळगाव : १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर पुण्यात बलात्कार केल्याची घटना ...

Kidnapping and raping a minor girl | पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

संशयिताला अटक : गुन्ह्यात कलम वाढविले

जळगाव : १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर पुण्यात बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी साहिल जावेद शेख (वय २२, म्हसावद, ता. जळगाव) या तरुणाला बुधवारी अटक करण्यात आलेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शेख याने एप्रिल महिन्यात पीडित तरुणीला फूस लावून पळविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार यांनी दोघांना काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. पीडित मुलीला मुलींच्या निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते. तेथे महिला व बालकल्याण समिती समोर साहिल याने आपल्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा जबाब दिला. त्यानुसार या गुन्ह्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचे वाढविण्यात आले. हे कलम वाढविताच साहिल याला बुधवारी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Kidnapping and raping a minor girl