खेडगावी औताच्या बैलाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:04+5:302021-07-24T04:12:04+5:30
शाॅक लागून मृत्यू प्रसंगवधानाने सालदार व एक बैल बचावला खेडगाव,ता. भडगाव : येथील प्रकाश रामभाऊ हिरे या शेतकऱ्याच्या ...

खेडगावी औताच्या बैलाचा शॉक लागून मृत्यू
शाॅक लागून मृत्यू
प्रसंगवधानाने सालदार व एक बैल बचावला
खेडगाव,ता. भडगाव : येथील प्रकाश रामभाऊ हिरे या शेतकऱ्याच्या बैलाचा शेतातील वीज खांबात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून मृत्यू ओढवला. सालदाराने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने त्यांचे प्राण वाचले.
ऐन खरीप हंगामातील मशागतीच्या दिवसात शेतकऱ्यांचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. शिवाय कामाचा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्याने वीज कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मागील पावसाळ्यात याच दिवसात शिवणी, कोळगाव येथे अशाच त-हेने दोन बैलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कोळगाव वीज उपकेंद्रातंर्गत जीर्ण झालेल्या वीजतारा व लोखंडी खांब बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रकाश पाटील यांचे कपाशीच्या शेतात औत सुरू होते. त्याच वेळेस शेतातील वीज खांबात वीजप्रवाह उतरलेला होता. पावसामुळे अगोदरच जमीन ओली असल्याने दुरूनच एका बैलास व सालदारास सौम्य धक्क्याने याची जाणीव होताच त्यांनी इतरत्र उडी घेत आपली सुटका करून घेतली. दुसरा बैल मात्र वीज खांबाकडे खेचला जात जागीच गतप्राण झाला. यामुळे पशुपालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.