खानापूरला ट्रक पेटवला
By Admin | Updated: January 18, 2017 00:09 IST2017-01-18T00:09:17+5:302017-01-18T00:09:17+5:30
कत्तलीच्या इराद्याने गुरे वाहतूक : दोन गोºह्यांचा मृत्यू

खानापूरला ट्रक पेटवला
रावेर : मध्य प्रदेशातून कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असल्याने संतप्त जमावाने ट्रकमधील गुरे चोरवड येथे न उतरवल्याने व दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याने ट्रक खानापूर गो शाळेत आणल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून दिला़ मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेतली़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़
सूत्रांच्या माहितीनुसार, कत्तलीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातून ट्रक (क्रमांक एमपी-०९-एचएफ-६०९४) मध्ये दोन कप्प्यात ५१ गुरांची वाहतूक होत असताना हा ट्रक लोणी आर.टी.ओ. नाका तोडून पसार होत असताना चोरवड नाक्यावर थांबवण्यात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता यश आले़
संतप्त जमावाने चोरवड येथेच ट्रकमधील गुरे खाली उतरवण्याची मागणी करीत दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या.
दरम्यान, रावेर पोलिसांनी चोरवड नाक्यावरून हा ट्रक खानापूर, ता़रावेर येथील गोशाळेत आणला मात्र ट्रकमधील दोन गोºह्यांचा गुदमरून मृत्यू झाला तर ४९ जिवंत गोºह्यांना खाली उतरवून सुटका करण्यात आली़
दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याचे संतप्त जमावाला कळताच जमावाने ट्रकवर पेट्रोल टाकून आग लावली. रात्री ८.४० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रावेर न.पा. अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)
पोलिसांनी घेतली धाव
४फौजदार ज्ञानेश फडतरे व दीपक ढोमणे यांनी संतप्त जमाव पांगवला़ पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक कैलास काळे, सहाय्यक निरीक्षक गणेश कदम यांनी धाव घेतली़ रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़