शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून? हे तपासण्याची गरज’; महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 07:13 IST

महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे.

जळगाव: आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ‘सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, नाही तर त्यालाही राजकारणात आणलं असतं,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याचा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. ‘अशाप्रकारे कुटुंबीयांवर बोलणे चुकीचे आहे. खडसेंनी हे विसरू नये की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं, याचे उत्तर द्यावे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज आहे,’ असे सांगत महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. 

महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा सुरू आहेत. दूध संघातील भानगडीच्या चौकशीमध्ये सबळ पुरावे हाती लागू लागले आहेत. म्हणून खडसे अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 गिरीश महाजनांना सत्तेचा माज आला : खडसे -    माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत अशा प्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा असल्याचे उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले आहे. -    माझ्या मुलाबद्दल वक्तव्य करून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत. त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी करावी.-    मात्र, अशा प्रकारे कोणाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करायला नको.  गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असून, त्यातून ते काहीही बरळत असल्याचे खडसे यांनी सांगितले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगाव