शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खडसे समर्थकांतर्फे भुसावळ ग्रामीण रुग्णालयात औषधी सामग्रीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 14:37 IST

माजी मंत्री खडसे समर्थकांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात औषधी सामग्रीची मदत केली.

भुसावळ : सध्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. भुसावळ तालुक्यातील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय जणू संजीवनीच आहे. येथे रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत, परंतु प्रशासकीय बाबींमुळे रुग्णांना लागणारी काही औषधे व व इतर सामग्री वेळेवर उपलब्ध होत नसल्याने  महामार्गावरील साकेगाव लगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे  यांच्या    समर्थकांनी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मदत म्हणून पीपझो इंजेक्शन ५० नग, मेरोपेनेम इंजेक्शन्स ५० नग, एन ९५ मास्क २०० नग, पिलो कव्हरसह ७० नगर, सॅनिटायझर ६० लीटर, ऑक्सी मीटर १० नग, थर्मामीटर गन दोन नग असे अंदाजे दोन लाख रुपयांचे साहित्य नगराध्यक्ष रमण  भोळे, प्रासुनील नेवे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, देवा वाणी, किरण कोलते, मुकेशपाटील, मुकेश गुंजाळ, संदेश सुरवाडे, राजकुमार खरात, बोधराज चौधरी, बापू महाजन, किशोर पाटील, अमोल इंगळे, प्रशांत अहिरे, मुन्नातेली, शफी पहेलवान, प्रमोद पाटील, अनिकेत पाटील आदींनी सहभागातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते मदत म्हणून दिल्या.याप्रसंगी खडसे यांनी  मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी सांगितले की, ट्रामा सेंटर मी मंत्री असताना पाठपुरावा करून मदत केली व या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधास मदत केली. आज या रुग्णालयाचा होणारा फायदा बघून समाधान वाटते, रुग्णालयात सुरू केलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामुळे तेथे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. सरकार आपल्या परीने भरपूर मदत कार्य करत आहे परंतु ही महामारी असल्याने सरकार प्रत्येक ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा काही प्रशासकीय बाबीमुळे सामग्री उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाने शक्य ती मदत करायलाच हवी. भुसावळातील नगरसेवकांनी दिलेली ही मदत नक्कीच रुग्णांना दिलासा देईल. आगामी काळातही असेच मदतकार्य करत राहावे, असे  आवाहन त्यांनी केले.लसीकरणासंदर्भातही खडसेंनी आरोग्य मंत्री राजेश  टोपे यांच्याशी संपर्क साधला व जिल्ह्यासाठी वेळेवर जास्तीच्या लस उपलब्ध करून देण्याबद्दल विनंती केली.याप्रसंगी दीपनगर केंद्राचे माजी अधिकारी राजेंद्र बाविस्कर, रमेश मकासरे, डॉ.मयुर चौधरी, डॉ.चाकूरकर, रुग्णालयातील स्टॉफ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ