मुक्ताईनगर : एकनाथराव खडसेंना धक्का : अॅड. रोहिणी खडसे पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:23 IST2019-10-24T15:19:16+5:302019-10-24T15:23:56+5:30
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अॅड.रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत ...

मुक्ताईनगर : एकनाथराव खडसेंना धक्का : अॅड. रोहिणी खडसे पराभूत
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अॅड.रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी १९८७ मतांनी पराभव केला. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी व चंद्रकांत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे. दरम्यान, अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे़ सकाळपासूनच चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़