समाज उत्थान पुरस्काराने केशव स्मृती सन्मानित

By Admin | Updated: May 24, 2017 18:17 IST2017-05-24T18:17:28+5:302017-05-24T18:17:28+5:30

कोल्हापूर येथे झाला पुरस्कार वितरण सोहळा

Keshav Smriti honored with social uplift | समाज उत्थान पुरस्काराने केशव स्मृती सन्मानित

समाज उत्थान पुरस्काराने केशव स्मृती सन्मानित

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.24- जळगावमधील विविध सेवाभावी संस्थांची एकछत्री आणि मातृसंस्था असलेल्या केशवस्मृती प्रतिष्ठानला जाहीर झालेला राज्य शासनाचा ‘फुले-शाहू-आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार’ बुधवारी कोल्हापूर येथे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री  राजमकुमार बडोले यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 
बुधवारी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये करण्यात आले.  राज्यातील सहा संस्थांना आणि 125 जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात  नाशिक विभागातून केशवस्मृती प्रतिष्ठानला हा पुरस्कार देण्यात आला. 
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा  पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि  सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री  राजमकुमार बडोले यांच्या हस्ते  प्रतिष्ठानचे सचिव र}ाकर पाटील, सहसचिव डॉ.रवी हिरानी, संचालक डॉ.विवेक जोशी, प्रशासकीय अधिकारी कृणाल महाजन, विवेकानंद प्रतिष्ठानच्या संचालिका  हेमा  अमळकर आणि  स्वप्नील चौधरी  यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  स्मृतिचिन्ह आणि पंधरा लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Web Title: Keshav Smriti honored with social uplift