Kerala Floods : सामाजिक संस्थांच्या मदतीने चाळीसगावातून केरळ पुरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:59 IST2018-08-29T12:58:35+5:302018-08-29T12:59:58+5:30
जीवनावश्यक वस्तुंचा समावेश

Kerala Floods : सामाजिक संस्थांच्या मदतीने चाळीसगावातून केरळ पुरग्रस्तांना मदत
चाळीसगाव, जि. जळगाव : केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून चाळीसगाव येथून जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. शहरातील सर्व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन ३०० साडी, ५०० लहान मुलांचे कपडे, ३०० लिटर घरगुती वापरण्याचे फिनाईल, १५० साबण जमा करुन सामाजिक दायीत्व जोपासुन आज सर्व सामान युवान या अहमदनगर येथील संस्थेच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी पाठवले.
सदर उपक्रमाचे आयोजन करीता छाया पाटील , दर्शना पवार , देवयानी ठाकरे , दिपाली राणा , डॉ सुनीता घाटे , डॉ उज्वला देवरे , मनिषा पाटील , मिनाक्षी निकम , संपदा पाटील , स्मिता बच्छाव , सोनाली पाटील , अजय जोशी, दीपक देशमुख , दिलीप घोरपडे, डॉ. अमित महाजन, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. महेश वाणी, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. प्रसन्ना अहिरे , डॉ. सुजित वाघ , डॉ. तुषार राठोड , डॉ. विनोद कोतकर , गजानन मोरे , हरेश जैन , केतन बुंदेलखंडी , कुशल जैन , महेश पिंगळे , मुराद पटेल , निशांत पाठक , प्रकाश कुलकर्णी , राहुल पोतदार, राजेश पवानी , आर एम पाटील , राजेंद्र छाजेड , समकित छाजेड , संजय पवार , शरद पाटील , सुजित पाटील , स्वप्नील धामणे , स्वप्नील कोतकर , चंद्रशेखर उपासनी , योगेश भोकरे , योगेश पाटील, सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.