Keep smiling for a healthy life! | निरोगी आयुष्यासाठी खळखळून हसत रहा !

निरोगी आयुष्यासाठी खळखळून हसत रहा !

जळगाव : सतत असलेला ताण-तणाव, धावपळीचे जीवऩ़़ त्यातचं दमा, मधुमेह, रक्तदाब आहे? सोबतचं गुडघेदुखी? मग विचार कसला करता, हसा न खळखळून! दिवसभरात दहा मिनिटे खळखळून हसला तर स्मरणशक्ती तर वाढतेच शिवाय रोग प्रतिकार शक्तीही वाढते़ त्यातचं गुलाबी थंडीला सुरूवात झाली असल्यामुळे शहरातील मोकळ्या मैदानांसह उद्यांमध्ये मनसोक्त हसण्याचा आनंद अनेक महिला व पुरूष लुटत आहे़
शहरातील ५ हास्य क्लबमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ बहिणाबाई उद्यान, गांधी उद्यान, खान्देश सेंट्रल तसेच भाऊंचे उद्यानामध्ये व्यायाम करणाऱ्यांची गर्दी होत आहे़
आणि तो क्लब आजही नियमित सुरू
धावपळीच्या या युगात हास्य जणू गायबच झाले आहे. निरोगी आयुष्य जगायचे असेल; तर हास्य अत्यंत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन सध्या शहरातील हास्य क्लब तणाव दूर करुन निरोगी आयुष्याचा मंत्र देत आहेत. यात विशेषत: ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. सन १९९८ मध्ये बहिणाबाई उद्यानात सुरू झालेला हास्यक्लब आजही तेथे सुरू आहे़ दीपिका बोरसे व राजकुमार पामनानी हे क्लबच्या सदस्यांना आजही हास्याचे धडे देतात़ नियमित ५० सदस्य याठिकाणी व्यायाम करतात़
प्रार्थनेने होतोे हास्यवर्गास प्रारंभ
उद्यानांमध्ये रोज सकाळी ६़३० ते ७ वाजेच्या दरम्यानात हास्य क्लबचा ग्रुप एकत्र येतो़ हास्यक्लब हे सर्वांसाठी खुले असल्यामुळे साधारण ३० ते ४० महिला-पुरूषांचा समूह उपस्थित असतो. सर्वात आधी प्रार्थनेला सुरूवात होते़ त्यानंतर मान, पाय, खांद्याच्या व्यायामासह ताडासन उर्ध्वताडासन, पर्वतासन, आदी व्यायाम करून हास्यवर्गाला सुरु होतो.
हसण्याचे फायदे
४शांत झोप लागते, पचनशक्ती वाढते.
४मधुमेहावर नियमित हास्याने सकारात्मक परिणाम जाणवतो.
४उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो
४चेहºयावर प्रसन्नता जाणवते.
४चांगला आॅक्सिजन पुरवठा होतो.
४रोगप्रतिकार शक्ती वाढते.
४शरीरातील प्रत्येक पेशीला व्यायाम मिळतो.

 

Web Title:  Keep smiling for a healthy life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.