शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भगवान जगन्नाथाला आपल्या हाताने खिचडी भरविणारी कर्मादेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:15 PM

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकील माधव भोकरीकर...

उत्तर प्रदेशातील साहू यांच्या घरात, चैत्र कृष्ण एकादशीला, एक कन्या जन्माला आली- कर्मादेवी. यथावकाश तिचा विवाह झाला. पतीचा तेलाचा व्यापार होता. कृष्णभक्तीत रमणारी कर्मादेवी, पतीच्या वाढणाऱ्या व्यापारामुळे, समाजोपयोगी कामामुळे, काहींनी राजाचे कान फुंकले.राजाला त्याचा द्वेष वाटू लागला. त्याचा तेलाचा व्यापार ठप्प करण्यासाठी, कल्पना निघाली, 'राजाच्या हत्तीला असाध्य खाजरोग झाला आहे. तो बरा होण्यासाठी तेलात औषधे टाकून, त्याला जर मनसोक्त डुंबायला दिले, तरच बरा होऊ शकतो. राज्यातील तलाव सात दिवसात तेलाने भरायला हवा, अन्यथा समस्त तेली समाजाच्या लोकांना कंठस्नान घालण्यात येईल, असे जाहीर झाले. सात दिवसात तलाव भरण्याचे काही चिन्ह दिसेना. समस्त तेली समाज चिंतीत झाला. आपल्या पतीवर, समाजावर आलेले संकट बघून, कर्मादेवीने भगवंताला साद घातली. तो हाकेला पावला. राजाचा तलाव तेलाने काठोकाठ भरला. कर्मादेवीचा जयजयकार झाला. तिची कीर्ती सर्वत्र पसरली. आज पण शिवपुरी जिल्ह्यातील नरवर गावात असलेला तलाव हा 'धर्मा तलैय्या' या नावाने ओळखला जातो.कर्मादेवीचा पुत्र अल्पायु ठरला. पतीचे निधन झाले. तिने सती जाण्याची तयारी केली. मात्र आकाशवाणी झाली, ‘तुझ्या पोटात बाळ वाढत आहे. तू सती जाऊ नको. मी तुला जगन्नाथपुरीला भेटेन.’ प्रत्यक्ष कृष्णाची आज्ञा कशी मोडणार? तिने सर्व कृष्णचरणी अर्पण करावयाचे ठरविले. एकदा अचानक, आपल्या मुलाला घेऊन ती माहेरी आली. तिथे मुलाला स्वाधीन केले आणि भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला पायी निघाली. चालता चालता थकलेल्या कर्माबाईचा डोळा अति श्रमाने केव्हा लागला, ते समजलेच नाही. सकाळी जाग आली, तर ती जगन्नाथपुरीला होती. भगवंताचे दर्शनास जाण्यासाठी मंदिराच्या पायºया चढू लागली. तिचा अवतार बघून मंदिराच्या लोकांनी तिला हाकलून लावले. ती समुद्रकिनाºयावर बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर मंदिरात बघतात तो काय, मंदिरातील भगवंताची मूर्ती नाहीशी झालेली. मूतीर्चा शोध सुरू झाला. समजले की समुद्र किनाºयावर प्रचंड गर्दी जमलेली आहे. भगवान श्रीकृष्ण कर्माबाईच्या मांडीवर बसून तिच्या हाताने खिचडी खात आहे. हे पाहून, मंदिराच्या लोकांनी भगवंताची क्षमा मागितली, ‘तुम्ही हिला मंदिरात येऊ दिले नाही, म्हणून मी इथे आलो.’ यासोबतच भगवंताने कर्मादेवीला वरदान दिले, की ‘छप्पन भोग ग्रहण करण्याअगोदर, मी खिचडीचा भोग ग्रहण करेल.’ तेव्हापासून भगवान जगन्नाथाला खिचडीचा पहिला भोग असतो. कर्मादेवीच्याच शब्दात-थाळी भरके ल्याई रे खीचड़ो, ऊपर घी की बाटकी। जीमो म्हारा श्याम धणी, जीमावै बेटी जाट की।।‘बारा बलुतेदार’ या समाजघटकांमधील ‘तेली’ हा समाज महाराष्ट्र व भारतासह दक्षिण आशियातदेखील आढळतो. पूर्वीच्या काळी तेलबियांमधून तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना ‘तेली’ या संज्ञेने ओळखले जाई. तेली समाज हिंदू तसेच मुस्लीम या दोन्ही धर्मांत आढळतो. इस्लामधर्मीय तेली यांचा उल्लेख तेली यापेक्षा ‘रोशनदार’ या नावाने केला जातो. महाराष्ट्रातील ‘ज्यू’ समाजातील, यांना ‘बेने इस्राएली’ या नावाने ओळखतात. याचा रहिवास हा कोकण किनाºयावर विशेषत: आहे. ते आपल्याकडे ‘शनिवार तेली’ नावाने परिचित आहेत. ‘शनिवार तेली’ म्हणजे त्यांच्या परंपरेप्रमाणे, हे शनिवारी तेल काढतात.सध्या ‘तेली’ ही जात ‘इतर मागासवर्गीय’ जातीत गणली जाते. वर्णाश्रमातील यांचे स्थान बघितले, तर बहुतांशपणे ते ‘वैश्य’ म्हणजे व्यापारउदीम करणारे म्हणून ते मानले जातात. राजस्थानात यांचा समाज स्वत:ला ‘क्षत्रिय’ समजतो. गुजरातमधील ‘घांची समाज’ हा तेली समाजाचाच एक भाग आहे.बंगालमध्ये व्यापारी आणि सावकार अशा सुवर्णनाबानीक, गंधबानीक, साहा सारखे ‘वैश्य’ म्हणून मानतात, राजस्थानात ते क्षत्रिय समजतात, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशपणे ते आपल्या कुटुंबाचे नाव न लावता चौधरी हे आडनाव लावतात. दक्षिण भारतात यांना तेली किंवा गंडला नावाने ओळखतात. यात देवगंडला, शेट्टीगंडला, सज्जनगंडला असे प्रकार आहेत. काही आपणास क्षत्रीय आणि रेड्डीगंडला समजतात. कर्नाटकात हे गानिगा किंवा गौडा, सोमक्षत्रिय गानिगा आणि काही लिंगायत गानिगा असे परिचित आहेत. तामिळनाडूत हे वनीय चेट्टीयार, गंडला चेट्टी, गानिगा चेट्टी, चेक्कलार, चेक्कू असे ओळखले जातात. केरळात चेट्टीअर असे ओळखतात. यातील उपजाती- तिळवण, शेनवार, राठोड, सावजी, शिरभाते, गुमाने, मलिक, तिरमल, एरंडेल, साहू, लिंगायत, वद्धार, ताहीमे, जैरात, मोदी, कोंकणी, मलिक साहू, पद्मवंशी या आहेत.-अ‍ॅड.माधव भोकरीकर

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव