भुसावळ येथे नाताळनिमित्त कॅरेल साँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 20:03 IST2018-12-16T20:02:16+5:302018-12-16T20:03:37+5:30
भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नाताळनिमित्त रविवारी प्रभू येशू यांचे क्रिसमस कॅरेल साँग सादर करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे कॅरेल साँग सादर केले.

भुसावळ येथे नाताळनिमित्त कॅरेल साँग
भुसावळ, जि.जळगाव : येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नाताळनिमित्त रविवारी प्रभू येशू यांचे क्रिसमस कॅरेल साँग सादर करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे कॅरेल साँग सादर केले.
‘झिंगेल बेल’, ‘तेरा हो अभिषेक’, ‘अमन के राजकुमार आज हमारे दिल मे जनम ले’ ‘हे प्रभू येशू महान’ अशी प्रभू येशूची विविध गीत विद्यार्थ्यांनी गायली.
ही गाणी सिनियर केजी, ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी म्हटली. शाळेत क्रीसमस ट्रीसह नाताळची सजावट करण्यात आली. यानंतर ‘स्पोर्टस डे’चा कार्यक्रम झाला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या रजनी सावकारे उपस्थित होत्या. प्राचार्या नीना कटलर, खुशबू अग्रवाल, मार्गेट सिंग, क्रिस्टिना सबलेट, मिशल गॉटींग, स्मिता नन्नवरे, वंदना मेढे, कविता सपकाळे, बर्नडेट रॉस, अनघा शिंदे, विजीनिया बर्नाड, मोतीमॅरी जॉन, विद्या साळुंखे, स्मिता जाधव व भारती मेढे यांच्यासह पालक उपस्थित होते.