शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

५५ अंगणवाड्यांमध्ये दहापेक्षा कमी बालकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:51 IST

आनंद सुरवाडे । जळगाव : जिल्हाभरातील ५५ अंगणवाड्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा की बालके उपस्थित राहत असल्याचा प्रकार सीएस अहवालानुसार ...

आनंद सुरवाडे ।जळगाव : जिल्हाभरातील ५५ अंगणवाड्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा की बालके उपस्थित राहत असल्याचा प्रकार सीएस अहवालानुसार समोर आला असून या मुलांना पूर्व शालेय शिक्षण मिळत नसल्यामुळे आता या सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून ३१ जानेवारीपर्यंत अहवाल पाठवावा, असे आदेश एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालयाकडून जि़ल्हा परिषदेला ला देण्यात आले आहे़पोषण आहार अभियानाअंतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते़ या उपक्रमांपैकी रिअल टाईम मॉनिटरींग करण्यात येत असून कॉमन अ‍ॅप्लीकेश सॉफ्टवेअरद्वारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योजना सनियंत्रण करण्यात येत आहे़नोव्हेंबर २०१९मध्ये सीएएस अहवालानुसार जळगाव जिल्ह्यातील ३ ते ६ वयोगटातील बालके अगदी कमी प्रमाणात अंगणवाड्यांमध्ये येत असल्याचे समोर आले आहे़ यात जिल्ह्यातील ८ अंगणवाड्यांमध्ये तर एकही बालक येत नसल्याचेही समोर आल्यामुळे याची चौकशी केली असता बालके केवळ आहार घेण्यासाठी येतात व निघून जातात, मात्र, पोषण अभियानाचा उद्देश केवळ आहार वाटप करणे नसून त्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण मिळणेही आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे़ त्यामुळे लवकरच अंगणवाड्यांची इमारत, अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षाचा बालकांची उपस्थिती स्तनदा मातांची संख्या, अंगणवाडी किती अंतरावर आहे़ अंगणवाडी सुरू ठेवावी अथवा बंद करावी, या बाबींचा सुस्पष्ट अहवाल मागविण्यात आला आहे़ज्या अंगणवाड्यांमध्ये कमी मुलांची संख्या आहे, अशा अंगणवाड्यातील मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये सामावून घेतले जाईल व येथील कर्मचाऱ्यांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात येईल, मात्र, हे सर्व काही सर्व्हेक्षणानंतरच ठरणार आहे, असे सांगण्यातआले़अंगणवाड्यांत बालक नाहीपोषण अभियानाच्या आयुक्तांच्या पत्राला अंगणवाड्यांची यादी जोडण्यात आली असून यात जवखेडा ता़ अमळनेर, पिंपळवाड ता़ चाळीसगाव, खरई ता़ चाळीसगाव, मोरचिडा ता़ चोपडा, गाड्या ता़ यावल, जामन्या ता़ यावल, उसमळी ता़ यावल, लंगडाआंबा ता़ यावल या ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये एकही बालक उपस्थित नसल्याचे म्हटले आहे तर यात ५५ अंगणवाड्यांची यादी देण्यात आली आहे़अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत़ ज्या सेविकांचे मोबाईल नादूरस्त आहेत, चोरीला गेलेले आहेत अशा ठिकाणची आकडे शून्य येत आहे़ मुळात मुले असतात मात्र तांत्रिक बाबीमुळे ही आकडेवारी शून्य दिसते़ सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून अहवाल देणार आहोत़-आऱ आऱ तडवी, महिला व बालविकास आधिकारी, जि़ प़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव