पोलीस संरक्षण देण्याची ज्योती पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST2021-02-20T04:47:22+5:302021-02-20T04:47:22+5:30

जळगाव : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीत प्राचार्यांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेनंतर या संस्थेच्या सचिव ज्योती सचिन पाटील यांनी पोलीस संरक्षण ...

Jyoti Patil's demand for police protection | पोलीस संरक्षण देण्याची ज्योती पाटील यांची मागणी

पोलीस संरक्षण देण्याची ज्योती पाटील यांची मागणी

जळगाव : नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीत प्राचार्यांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेनंतर या संस्थेच्या सचिव ज्योती सचिन पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सध्या महाविद्यालयात परीक्षांचे वातावरण आहे. त्यातच प्राचार्यांना धक्काबुक्कीची घटना घडली. या महाविद्यालयात विलास मूलचंद पाटील हे पदवी अभ्यासक्रमाचे तर ज्योती पाटील यांचे पती सचिन भीमराव पाटील हे डिप्लोमा विभागाचे प्राचार्य आहेत. या घटनेने महाविद्यालयात दहशतीचे वातावरण आहे. तसेच काही बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप ज्योती यांनी पोलीस अधीक्षकांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पती यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. आणि पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Jyoti Patil's demand for police protection