आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स्तरावर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शिवाजी उद्यान परिसरात म्हशी चारणा-या एका व्यक्तीला झुडपांमध्ये एक मृतदेह आढळून आला. ही माहिती उद्यानात वाºयासारखी पसरली. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, भरत लिंगायत यांच्यासह कर्मचाºयांचा ताफा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तासाभरानंतर पटली ओळखसोनु याचा मृतदेह अतिशय झुडपात होता.मृतदेह पालथा असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलीस आल्यानंतर मृतदेह सरळ करण्यात आला तेव्हा उद्यानातील काही तरुणांनी सोनुला ओळखले. सोनु हा मंगळवारी दुपारी अडीच वाजेपासून घरातून बाहेर गेला होता. मित्राच्याही लग्नात तो गेला होता. सायंकाळी तो घरी आलाच नाही.
जळगाव शहरातील शिवाजी उद्यानात आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:35 IST
मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स्तरावर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जळगाव शहरातील शिवाजी उद्यानात आढळला तरुणाचा मृतदेह
ठळक मुद्दे झाडांच्या झुडपात होता मृतदेह घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून पंचनामा