भुसावळात लिंपसक्लबमध्ये रंगला ज्येष्ठांचा सोहळा
By Admin | Updated: April 18, 2017 13:33 IST2017-04-18T13:33:20+5:302017-04-18T13:33:20+5:30
द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
भुसावळात लिंपसक्लबमध्ये रंगला ज्येष्ठांचा सोहळा
भुसावळ,दि.18- द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे पवित्र इस्टर संडेला शहरातील लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या अनोख्या गौरव सोहळ्याने ज्येष्ठ नागरीक गहिवरले.
या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन व नृत्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला. दरम्यान, प्रसंगी द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष व माजी आमदार बॅरी ओब्रायन यांचे खास तयार करण्यात आलेल्या डिजिटल पडद्यावर भाषण ऐकविण्यात आले. त्यांनी समाजात एकी व शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. दरम्यान, असोसिएशनचा हा सोहळा समाजातील सर्वासाठी होता. अध्यक्ष एझलीन डॉसन, उपाध्यक्ष केव्हीन सायमन्स, ग्लेन यंग, मारीया यंग, खजिनदार विलमा किंगसेलर्स, सचिव स्टीवन डेवी, कार्यकारिणी सदस्य- रॉडनी क्लेन्सी, एलवीस पावल, एलवीस मेसन, इएन किंगसेलर, अॅन्जीला डेवी, मेलवीन क्लेन्सी, क्रीस्टोफर क्लॅन्सी, एएन डॉसन, शेरल क्लॅन्सी उपस्थित होते.
या ज्येष्ठांचा झाला सन्मान
मारी क्लॅन्सी, मालू क्लॅन्सी, व्हिलमा कींगसेलर, मॅलकम बर्नाड, रसूल गॉटींग, पॅडसी प्रेसडी, कॉरल डिसील्व्हा, शॉमीन गॉटीन, ग्लॅन्स सायमन्स, रिटा बनार्ड, हायसेन, डेरीफ गॉटीन, मिसेस डिसुजा, लूई कॉनेल, बबल रायडर, ऑड्री सायमन्स, चबू वेगस या ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.