फैजपूर येथे जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:33 IST2018-12-24T15:31:57+5:302018-12-24T15:33:18+5:30

फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

Jugara raid at Fazpur | फैजपूर येथे जुगारावर धाड

फैजपूर येथे जुगारावर धाड

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून कारवाईसहा हजार रुपयांच्या रोकडसह ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्याततीन आरोपींना अटकदोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी

फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांंना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पोलीस कर्मचारी रफिक शेख कालू, विजय नामदेव सोनवणे, सुनील दामोदरे, अजय पाटील या पथकाने खिरोदा रस्त्यावर चालणाºया जुगार अड्ड्यावर धाड घातली. यावेळी जुगार खेळणाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यात जुगार खेळताना संदीप श्रावण चौधरी (रा.सावदा), इमाम गंभीर तडवी (रा.खिरोदा), नितीन जगन्नाथ चौधरी (रा.चिनावल) या तिघांना पोलिसांनी अटक केली, तर जुबेर नदीम शेख, मोसिन उर्फ लंगडा राजू हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
आरोपींकडून सहा हजार ५३० रुपये रोख व मोबाइल, मोटारसायकल असा एकूण ३८ हजार ९८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली किरण साठे करीत आहे.

Web Title: Jugara raid at Fazpur