शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सालदार ते उपसभापती रावण भिल्ल यांचा प्रवास थक्क करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 17:10 IST

रावण भिल्ल यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आल्याबळावर बांबरुड गावात जल्लोष करण्यात आला.

प्रमोद ललवाणीकजगाव, ता. भडगाव : घरात कोणताही राजकीय वारसा नाही. मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणारे रावण भिल्ल यांचे कुटुंब मिळेल ते काम करायचे अन्‌ पुढे चालायचे. राजकारणाचा कोणताही गंध नाही. राजकारणाची ओढ नाही. मात्र जनता जनता जनार्दनाला रावण पुढे गेला पाहिजे म्हणूनच जनतेच्या आशिर्वादाने ते ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच ते थेट भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान झाले.बांबरूड बुद्रूक, ता. भडगाव येथील रहिवासी आदिवासी कुटुंबातील सदस्य असलेले रावण भिल्ल यांचे शिक्षण बाबरूड येथील प्राथमिक शाळेत झाले. जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत मिळेल ते काम करत घर परिवाराचे रहाडगाडगे ओढत असतानाच रोजंदारीवर काम करत असतानाच ऐन तारुण्यात सालदारकी सुरू केली. मोलमजुरी करणे हेच आपले विश्व समजत प्रामाणिकपणे १५ वर्षे सालदारकी केली.या दरम्यान ग्रामस्थांचे प्रेम मिळाले. आपल्याप्रति ग्रामस्थांमध्ये प्रेम निर्माण केले अन्‌ ग्रामस्थांच्या मनात आपलं घर निर्माण केलं. मग ग्रामस्थांनी त्यांना राजकारणात ओढण्यासाठी प्रयत्न केला. त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर पुढील पंचवार्षिकीत बिनविरोध उपसरपंच, यानंतर मात्र चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारत सरपंच पदावर विराजमान झाले.ना राजकारणाचा गंध, ना घरात राजकीय वारसा. केवळ जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राजकारणात प्रवेश झाला. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य ते ग्रामपंचायत सरपंच या पदावर असताना प्रत्येकाच्या मदतीसाठी धाऊन जाण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या रावण यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी विश्वास टाकत गोंडगाव गणातून पंचायत समिती सदस्यासाठी उमेदवारी दिली. या चौरंगी सामन्यात रावण भिल्ल विजयी झाले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या कामाचा झपाटा सुरूच ठेवल्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत साऱ्यांनाच भावली नि भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदाची संधी चालत आली. १३ ऑगस्टला ते या पदावर विराजमान झाले. हे वृत्त गोंडगाव गणात पसरताच अनेकांनी भिल्ल यांचे अभिनंदन केलेसालदार ते उपसभापती हा प्रवास निश्चितच थक्क करणाराबांबरूड गावच लकीबांबरुड गावाला या अगोदर सभापती, उपसभापती, प्रभारी सभापती अशी पदं चालून आली. यात रत्नाबाई कैलास पाटील या सन २०१० प्रभारी सभापती, यानंतर सन २०११/१२ मध्ये सभापती, यानंतर सन २०१५ मध्ये राजेंद्र लालचंद परदेशी यांना प्रभारी सभापती म्हणून पद चालून आले. आता याच गावातील रावण भिल्ल हे १३ रोजी भडगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान झाले. बांबरुड गाव लहान. मात्र या गावाला पद चालृून आले, हे विशेष.

 

टॅग्स :PoliceपोलिसBhadgaon भडगाव