जामनेर येथे पहाडीबाबांची यात्रा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 17:31 IST2020-02-09T17:30:22+5:302020-02-09T17:31:20+5:30

पहाडीबाबा यात्रेला रविवारी उत्साहात सुरुवात झाली.

The journey to the hill started at Jamner | जामनेर येथे पहाडीबाबांची यात्रा सुरू

जामनेर येथे पहाडीबाबांची यात्रा सुरू

ठळक मुद्देपहाडीबाबांच्या यात्रेत भाविकांची गर्दीदोन दिवस चालणार यात्रा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

जामनेर, जि.जळगाव : पहाडीबाबा यात्रेला रविवारी उत्साहात सुरुवात झाली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेलेल्या या ठिकाणी भाविक नवस फेडण्यासाठी येतात.
शहराजवळचा असलेल्या टेकडीवर पहाडी बाबांचा दर्गा आहे. येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. टेकडीच्या तळाशी दुकाने थाटली आहेत. सोमवारपर्यंत यात्रा सुरू राहील.
परिसरातील गावातून नागरिक सवाद्य मिरवणुकीने नवस फेडण्यासाठी येतात. येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.

Web Title: The journey to the hill started at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.