जेसीआय राष्ट्रीय अध्यक्षांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:01+5:302021-08-26T04:20:01+5:30

जळगाव : जेसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षा राखी जैन या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असून, त्यांनी जळगाव, पाचोरा, भुसावळ इत्यादी ठिकाणी ...

JCI National President felicitated | जेसीआय राष्ट्रीय अध्यक्षांचा सत्कार

जेसीआय राष्ट्रीय अध्यक्षांचा सत्कार

जळगाव : जेसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षा राखी जैन या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असून, त्यांनी जळगाव, पाचोरा, भुसावळ इत्यादी ठिकाणी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे बैठक झाली. या वेळी झोन समन्वयक जिनल जैन यांनी त्यांचा ‘जेसीआय ऑफ डायमंड’ पुरस्काराने सत्कार केला.

या बैठकीत आगामी काळातील सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा झाली व नियोजन करण्यात आले. झोन प्रेसिडेंट अनुप गांधी, जितेंद्र बोरा, जेसीआय डायमंडचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, आभा दरगड, सोनल झवर, जेसीआय भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल, मनीषा चोरडिया, हेमा बेहरा, कृष्णा अग्रवाल, दीपा पटेल, पाचोरा अध्यक्ष मयूर दायमा, श्रेणिक जैन, ऋषभ शाह आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन - राखी जैन यांचा सत्कार करताना जिनल जैन. सोबत सुशील अग्रवाल.

Web Title: JCI National President felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.