जळगावच्या महापौरपदी जयश्री महाजन, भाजपचे २७ नगरसेवक फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 01:21 PM2021-03-18T13:21:35+5:302021-03-18T13:47:30+5:30

भाजपचे २७ नगरसेवक फुटले : भाजपच्या प्रतिभा कापसे यांना पडले ३० मतं ; मनपावर शिवसेनेचा भगवा 

Jayashree Mahajan, BJP's 27 councilors split as Jalgaon mayor | जळगावच्या महापौरपदी जयश्री महाजन, भाजपचे २७ नगरसेवक फुटले

जळगावच्या महापौरपदी जयश्री महाजन, भाजपचे २७ नगरसेवक फुटले

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका महापौर उपमहापौर निवडणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनही ही निवड प्रकिया वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहे.

जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपचा प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्‍चित केले आहे. जयश्री महाजन यांना 45 मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने  व एम आय एम चा तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली आहेत.

महापालिका महापौर उपमहापौर निवडणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनही ही निवड प्रकिया वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहे.  महापौर-उपमहापौर यांच्या अर्जावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आल असून दोन्ही उमेदवारांचा सूचक अनुमोदक यांचे नाव राज पत्राचा नियमानुसार नसल्याचा दावा भाजपने केलाय. ऍड. शुचिता हाडा यांनी याबाबतचा आक्षेप घेत स्वाक्षरी मध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला.  तर, गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेतला असून महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही बेकायदेशीर प्रक्रिया असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. ऍडव्होकेट हाडा यांचा आक्षेप फेटाळण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपचा प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्‍चित केले आहे. जयश्री महाजन यांना 45 मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने  व एम आय एम चा तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली आहेत.

जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत होती. भाजपकडून प्रतिभा कापसे या महापौर तर सुरेश सोनवणे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून जयश्री महाजन या महापौर तर भाजप बंडखोर कुलभूषण पाटील हे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यासाठी, सध्या ऑनलाईन सभा होत आहे. सेना व भाजप बंडखोर हे ठाण्यात असून पत्रकारांना सभेत मनाई करण्यात आली होती. 

Web Title: Jayashree Mahajan, BJP's 27 councilors split as Jalgaon mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.