यावल तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी जयंत चौधरी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 15:21 IST2020-12-27T15:20:37+5:302020-12-27T15:21:12+5:30

यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जयंत रमेश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Jayant Chaudhary unopposed as Yaval Taluka Headmaster Association President | यावल तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी जयंत चौधरी बिनविरोध

यावल तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी जयंत चौधरी बिनविरोध

डोंगर कठोरा : यावल तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी माध्यमिक विद्यालय वड्रीचे मुख्याध्यापक जयंत रमेश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणीची निवड प्रक्रिया निवडणूक निरीक्षण जी.आर.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष शेख अशपाक शे.याकूब (आयडियल उर्दू मारुळ), सचिव निशा पाटील (मुलींचे विकास विद्यालय, यावल), सदस्य म्हणून संजीव बोठे (घ.का.विद्यालय, आमोदा), गिरीश पाटील (एल. एम.पाटील विद्यालय राजोरा), उमाकांत महाजन (डि.के.विद्यालय, डांभुर्णी), शिवराम सोनवणे (प्रभात विद्यालय, हिंगोणा), शावखा तडवी (डी.एच जैन कोरपावली) यांचा समावेश   आहे. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी डी.व्ही. पाटील, व्ही.जी.तेली, बी.पी.पाटील, अलका इंगळे, सुनीता पाचपांडे यांच्यासह तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी, तर आभार व्ही.एम.राणे यांनी मानले.

Web Title: Jayant Chaudhary unopposed as Yaval Taluka Headmaster Association President