जामनेरच्या शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:28 IST2019-03-12T23:28:27+5:302019-03-12T23:28:39+5:30
जामनेर : सवतखेडे, ता.जामनेर येथील रहिवासी व सोयगाव, जि. औरंगाबाद येथील जि.प.शाळेत कार्यरत असलेले दिलीप पोपट पाटील (वय ४०) ...

जामनेरच्या शिक्षकाची आत्महत्या
जामनेर : सवतखेडे, ता.जामनेर येथील रहिवासी व सोयगाव, जि. औरंगाबाद येथील जि.प.शाळेत कार्यरत असलेले दिलीप पोपट पाटील (वय ४०) यांचा मृतदेह बोदवड रस्त्यावरील रामवनात मंगळवारी सायंकाळी आढळून आला. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे.
पाटील यांच्या पत्नी जयश्री या जरंडी, ता.सोयगांव येथे शिक्षिका असून दिलीप पाटील यांनी त्यांना सकाळी एस.टी.त बसविले व मोटार सायकलने सोयगावला जातो असे सांगितले. दुपार पर्यंतही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. सायंकाळी सहा वाजेच्या एका शिक्षकाला सुमारास त्यांची गाडी बोदवड रस्त्यावरील रामवनाबाहेर दिसल्याने त्यांनी शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोद केली आहे.