जामनेरला बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:11 PM2020-01-24T18:11:21+5:302020-01-24T18:12:30+5:30

स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी पुरुषांइतकीच महिलांचीदेखील आहे. महिलांनी या कुप्रथेला विरोध केल्यास स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या कार्यक्रमात केले.

Jamner's daughter rescue, daughter education program | जामनेरला बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रम

जामनेरला बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रम

Next
ठळक मुद्देस्त्री भ्रूणहत्येस महिलांनीच विरोध करावा- दिलीप खोडपे स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी पुरुषांइतकीच महिलांचीदेखील

जामनेर, जि.जळगाव : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी पुरुषांइतकीच महिलांचीदेखील आहे. महिलांनी या कुप्रथेला विरोध केल्यास स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या कार्यक्रमात केले.
‘बेटी बचाव बेटी पढाव’ अंतर्गत बाजार समितीत हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला गटविकास अधिकारी ईश्वर गोयर बालविकास प्रकल्प अधिकारी पी.एम.परदेशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सांगितले की, स्त्री भ्रूणहत्या ही वाईट प्रथा बंद पाडली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहे. पहूरपेठ येथील सरपंच नीता पाटील यांना ‘लोकमत’कडून राज्यस्तरीय पुरस्कार दिला गेला हा मोठा सन्मान स्त्री शक्तीचा आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात न्यायाधिश एम.एम.चितळे व न्यायाधिश सचिन हवेलीकर यांनी उपस्थित महिलांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एक अथवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या तालुक्यातील नऊ मातांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात सविता पाटील (सोनाळे), सुनीता महाजन (जामनेर), सारिका राजपूत (गोंडखेल), रशीद तडवी (जांभोळ), मनीषा घोरपडे (वडाळी), शुभांगी मदने (जामनेर), ज्योती महाजन (वडकिल्ला), फातिमा सुरवाडे (चिंचोली पिंप्री), व निर्मला सुरवाडे (किन्ही), व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व डॉ.पल्लवी सोनवणे. याबरोबरच ३२ अंगणवाडी मदतनीस, १० पर्यवेक्षिका व १६ अंगणवाडी सेविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पहूरपेठ येथील सरपंच नीता पाटील यांना ‘लोकमत’कडून मुंबई येथील कार्यक्रमात गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा जि.प.च्या माजी सभापती रजनी चव्हाण, सभापती सुनंदा पाटील, माजी सभापती नीता पाटील, जि.प.सदस्य प्रमिला पाटील यांनी सत्कार केला.
गाडेगाव येथील उज्वला आत्माराम पवार यांच्या पूजा या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांना एक मुलगा होता. त्यांनी गावातील मुलीला दत्तक घेत तिचे नाव पूजा ठेवले. याबद्दल पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. नवी दाभाडी व पळासखेडे बुद्रूक येथील तीन दाम्पत्यांनी मुलगी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
उपसभापती एकनाथ लोखंडे, सुरेश बोरसे, सहाय्यक गटविकास अधिकारी के.बी.पाटील, नवल पाटील, राजेश चिंचोरे, अर्चना धामोरे यांच्यासह महिला मोठ्या संखेने उपस्थीत होत्या. सूत्रसंचालन भारती भिसे यांनी व आभार स्वप्ना कुमावत यांनी आभार मानले.

 

Web Title: Jamner's daughter rescue, daughter education program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.