जामनेरला ऊर्दु ब्रिज कोर्स कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:58+5:302021-07-02T04:11:58+5:30
जामनेर : ऊर्दु केंद्रातील सेतू अभ्यासक्रम ब्रीज कोर्स ऊर्दू माध्यमाची अंमलबजावणीसाठी खासगी व जि.प. मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या ...

जामनेरला ऊर्दु ब्रिज कोर्स कार्यशाळा
जामनेर : ऊर्दु केंद्रातील सेतू अभ्यासक्रम ब्रीज कोर्स ऊर्दू माध्यमाची अंमलबजावणीसाठी खासगी व जि.प. मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.
या कोर्सच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील ९ शिक्षक प्रशिक्षण घेऊन आले आहेत. गुरुवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
साबीर खान (जामनेर ऊर्दु बाॅईज शाळा), शेख मोहसिन अ. मुनाफ (फत्तेपूर), शाह अब्दुल्लाह रज़ा (वाकडी), मुजीबुर्रहमान शेख मुसा (जामनेर गर्ल्स स्कूल), ज़ाहिद पटेल (पहूर), अक़ील अहेमद जलील अहेमद (इकरा तोंडापूर हायस्कूल), शेख आमिल महेबूब (मुहम्मदिया हायस्कूल शेंदुर्णी), नीलोफर नाज़ नईम (जामनेर उर्दू बाईज), पठाण रज़िया बेगम इब्राहिम (जामनेर गर्ल्स स्कूल) यांनी पुणे येथे प्रशिक्षण घेतले. ब्रिज कोर्सची संकल्पना साबीर खान शब्बीर खान यांनी सांगितली. मोहसीन अ.मुनाफ यांनी माहिती दिली.