जामनेरला निवडणुकीचे कामकाज नवीन इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:19 IST2019-09-23T23:19:22+5:302019-09-23T23:19:27+5:30
जामनेर : विधानसभा निवडणुकीचे कामकाज नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत होणार असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली. ...

जामनेरला निवडणुकीचे कामकाज नवीन इमारतीत
जामनेर : विधानसभा निवडणुकीचे कामकाज नव्याने बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत होणार असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली.
२७ सप्टेंबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या दृष्टीने नव्या इमारतीत प्रशासकीय तयारी केली जात आहे. तहसील कार्यालयाची जुनी इमारत पडून नवीन बांधकामास दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. इमारतीचे लोकार्पण झालेले नसले तरी सध्या वापरात असलेली जागा कमी पडत असल्याने निवडणुकीचे कामकाज नवीन इमारतीत केले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी आज येथे येऊन कामकाजाची माहिती घेतली.