Jamner to plant trees at the expense of the latter | देवपिंप्री येथे उत्तरकार्याच्या खर्चातून वृक्षारोपण संकल्प

देवपिंप्री येथे उत्तरकार्याच्या खर्चातून वृक्षारोपण संकल्प


जामनेर : उत्तरकार्यावर खर्च न करता विधी घरातच साधेपणाने करुन गावातील स्मशानभूमीत वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प देवपिंप्री, ता.जामनेर येथील माजी सरपंच व बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम यांनी केला.
निकम यांच्या पत्नी लताबाई यांचे शनिवारी उत्तरकार्य होते. गावातील स्मशानभूमीत निकम यांनी २५ वृक्ष लावले व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. सुरेश शिंदे, रमेश पाटील, रवींद्र हिंगणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत

Web Title: Jamner to plant trees at the expense of the latter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.