जामनेरला लॉकडाऊनमुळे रथोत्सव मिरवणूक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 14:04 IST2020-04-07T14:04:09+5:302020-04-07T14:04:58+5:30
दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची परंपरा कोरोनातील लॉकडाऊनमुळे यंदा खंडित झाली.

जामनेरला लॉकडाऊनमुळे रथोत्सव मिरवणूक नाही
ठळक मुद्देरथोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरापरंपरा प्रथमच ‘कोरोना’मुळे खंडित
जामनेर, जि.जळगाव : सुमारे दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची परंपरा कोरोनातील लॉकडाऊनमुळे यंदा खंडित झाली.
गोविंद महाराज संस्थानकडून नगारखान्यात श्रीरामांच्या रथाची बुधवारी सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी दीपक जोशी, सदानंद जोशी, प्रताप पाटील, निखिल जोशी, सुधाकर सराफ, राजू शर्मा, प्रदीप महाजन, दिनेश जोशी, सुभाष शिंदे, रमेश पाटील उपस्थित होते.
रथोत्सवानिमित्त शहरातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. रस्त्यावर थांबून महिला पूूजा करीत असत. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे परंपरा खंडित झाली.