जामनेर पोलिसांवर जुगाऱ्यांकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:34 IST2019-05-09T16:34:13+5:302019-05-09T16:34:50+5:30
पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक जखमी

जामनेर पोलिसांवर जुगाऱ्यांकडून दगडफेक
जामनेर : शहरातील पुरा भागातील इंदिरा आवास जवळ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या सहकाºयांवर दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यात निरीक्षक प्रताप इंगळे व उपनिरीक्षक विकास पाटील जखमी झाले.
मंगळवारी अक्षय तृतीया असल्याने शहरातील विविध भागात पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. इंदिरा आवासजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून निरीक्षक इंगळे, उपनिरीक्षक पाटील सहकाºयांसह तेथे पोहचले.
पोलिसांना पाहताच पत्ते खेळणारे पळून गेले. त्यातील काही जणांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत इंगळे यांच्या डोक्यास व पाटील यांच्या हाताच्या बोटास जखम झाली.
उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या फिर्यादीवरूगन अनोळखी ८ ते १० हल्लेखोरांविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३२, ३३३, १४१, १४३, १४७, १४८ व १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दिवसभर हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता.