जामनेर पालिका कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:24 IST2019-07-24T17:22:22+5:302019-07-24T17:24:40+5:30
पालिका व महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचा निर्णय घेतल्याने जामनेर पालिकेतील कर्मचाºयांनी बुधवारी सकाळी आनंदोत्सव साजरा केला.

जामनेर पालिका कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष
जामनेर, जि.जळगाव : पालिका व महापालिकेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या दि. २३ रोजी झालेल्या बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचा निर्णय घेतल्याने जामनेर पालिकेतील कर्मचाºयांनी बुधवारी सकाळी १० वाजता फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. या वेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, कर्मचारी संघटनेचे समाधान वाघ, उपनगराध्यक्ष अनिस शेख, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जितू पाटील, बाबूराव हिवराळे, नाजीम शेख, खलील खान, दत्तू जोहरे, ईश्वर पाटील, सी. एन. खर्चे , संदीप काळे, श्रीकांत भोसले, रवी महाजन, रमेश हिरे, दत्तू साबळे, आत्माराम शिवदे, संजय सोनार, प्रकाश माळी, नरेंद्र पाटील, राजू पाटील यांच्यासह पालिकेतील महिला व पुरूष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.