शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जामनेर, अमळनेरवर डोळा ठेवूनच राष्टÑवादीची ‘रावेर’ वर तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:15 AM

बेरजेचे राजकारण । लोकसभेतच सोडविले जातेय विधानसभेचे गणित

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात राष्टÑवादीला जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघ देण्याची तयारी कॉँग्रेसने दाखवली असल्याचे राजकीय क्षेत्रातील चर्चांवरून समजते. गत काही निवडणुकांमध्ये या मतदार संघांमधून राष्टÑवादी कॉँग्रेसच प्रभावी असल्याचे लक्षात येते. आगामी विधानसभेसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचे बेरजेचे राजकारण यात असल्याचेच बोलले जात आहे.रावेर लोकसभा मतदार संघ कॉँग्रेस-राष्टÑवादीतील वाटाघाटीनुसार कॉँग्रेसकडे होता. मात्र यावेळी सक्षम व प्रबळ असा उमेदवार या पक्षाला मिळाला नाही. त्यातच हा मतदार संघ मिळावा म्हणून कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील नेते मंडळींकडून प्रयत्न सुरू होते. राष्टÑवादीकडून कॉँग्रेसच्या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनाही आमच्याकडे या उमेदवारी देतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याला डॉ. उल्हास पाटील यांनी नकार दिला.अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसने जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या बदल्यात रावेर लोकसभा मतदार संघ कॉँग्रेसकडे दिल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.बदलती समिकरणेअमळनेर व जामनेर विधानसभा मतदार संघांचा विचार करता या दोन्ही ठिकाणी कॉँग्रेसपेक्षा राष्टÑवादीच्या उमेदवारांनी जास्त मते मिळविली असल्याचेच लक्षात येते. जामनेर मतदार संघातील विद्यमान आमदार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय स्पर्धक म्हणून परिचित असलेले संजय गरूड हे सध्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. तर अमळनेरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारे अनिल भाईदास पाटील हे भाजपातून राष्टÑवादीकडे आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादीच्या उमेदवारीसीठीचे ते प्रबळ दावेदारही होते. त्यामुळेच राष्टÑवादीने रावेर लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात हे दोन विधानसभा मतदार संघ आपल्याकडे घेतल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.जामनेर विधानसभा मतदार संघजामनेर विधानसभा मतदार संघ कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीने गेल्या वेळी एकत्र लढविला नव्हता. कॉँग्रेसकडून ज्योत्स्ना विसपुते, राष्टÑवादी कॉँग्रेसकडून डी.के. पाटील हे उमेदवार होते. यावेळी भाजपाने बाजी मारत १०३४९८ मते मिळवून विजयी झाले. राष्टÑवादीचे डी.के. पाटील यांना दोन नंबरची मते होती. त्यांना ६७७३० अशी मते होती. कॉँग्रेसच्या ज्योत्स्ना विसपुते यांचा दारूण पराभव झाला होता. हा मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून कॉँग्रेसकडेच होता.अमळनेर विधानसभा मतदार संघअमळनेर विधानसभा मतदार संघात २००९ व नंतर २०१४ मध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे. २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना ६८१४९ मते होती. तर भाजपाचे अनिल भाईदास पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ४६९१० मते होती. तिसºया क्रमांकावर राष्टÑवादीचे साहेबराव पाटील होते. तर चौथ्या क्रमांकावर कॉँग्रेसचे गिरीष पाटील होते. त्यांनाही अत्यल्प मते या मतदार संघात होती.रावेर लोकसभेची जागा कॉंग्रेसला दिल्याच्या मोबदल्यात जामनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. आघाडीचे कार्यकर्ते सर्व शक्ती एकवटून विधानसभेची निवडणूक लढवतील. उमेदवारी कुणालाही मिळो, जलसंपदामंत्री यांच्या विरोधात लढून जिंकण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. -संजय गरुड, राष्ट्रवादी नेते, जामनेर.कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवू. जागावाटपात जामनेर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे येणार असल्याचे समजल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो. पराभव झाला मात्र मोठ्या प्रमाणात मते मिळाली. येऊ घातलेली निवडणुक सर्व शक्तीनिशी लढू व जिंकू.- डी.के.पाटील, राष्ट्रवादी नेते, जामनेर.रावेर लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात जामनेर व अमळनेरची जागा मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे. श्रेष्ठींनी याबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. -अ‍ॅड. रवींद्र पाटील,जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस.असे निर्णय एकदम होत नसतात. पक्षाकडून जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेऊन मतदार संघाबाबत निर्णय घेतला असता मात्र सध्या केवळ चर्चा पसरविली जात आहे. अद्याप मतदार संघांबाबत कोणताही निर्णय नाही.-अ‍ॅड. संदिप पाटील, जिल्हाध्यक्ष कॉँग्रेस.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स